मुख्यमंत्रीजी, थोडातरी पॉझ घ्या : छगन भुजबळ

0

नाशिक : राज्यात सत्तासंघर्ष सुरु झाल्यापासून एकनाथ शिंदे हे राज्यभरात दौरे, बैठका आणि गाठीभेटी घेत आहेत. या सततच्या दगदगीमुळे एकनाथ शिंदे हे आजारी पडले आहेत. डॉक्टरांनी सध्या त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली आहे.

आपल्या शरीराच्या काही मर्यादा असतात. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला. राज्यात सध्या दोनच मंत्री आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री रात्री दोन-दोन वाजेपर्यंत जागतात, प्रवास करतात. आपल्याला पण देह आहे, त्याची परिसीमा आहे. त्यामुळे थोडातरी पॉझ हा घ्यावाच लागतो, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

छगन भुजबळ गुरुवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊतांवरील ईडीची कारवाई, मंत्रिमंडळ विस्तार, महापालिकेची प्रभागरचना अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पीएमएलए हा कायदा राक्षसी असल्याचे विरोधक म्हणतात. पण हा कायदा यूपीए सरकारच्या काळात तयार करण्यात आला. काँग्रेसचे सरकार असताना पी.चिदंबरम यांनीच हा कायदा बनवला होता. त्यामुळे भाजपला तरी काय नावं ठेवणार, असे भुजबळ यांनी म्हटले. येत्या ५ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल का याबाबत माहीत नाही. अनेक याचिकांची गुंतागुंत सुप्रीम कोर्टात चालू आहे, ती कशी सुटते ते बघू, असेही त्यांनी सांगितले.

ईडीच्या केसमध्ये लवकर जामीन मिळत नाही: भुजबळ

यावेळी संजय राऊत यांनी संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईबाबतही भाष्य केले. शरद पवार हे संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर गप्प आहेत, या चर्चेत काही तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते याबाबत बोलत आहेत. सुप्रिया सुळे देखील याबाबत बोलल्या. पण ईडीच्या कायद्यात लवकर जामीन मिळत नाही. पण काही मार्ग निघाला तर आमच्या शुभेच्छाच आहेत, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:03 PM 04-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here