संजय राऊतांवरील ईडी कारवाई प्रकरणावर शरद पवार गप्प का? भुजबळांचे सूचक उत्तर…

0

नाशिक : शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी PMLA न्यायलायाने ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली.

१ ऑगस्टला त्यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने छापेमारी केली. त्याआधी तीन वेळा संजय राऊत ईडीचे समन्स येऊनही चौकशीला हजर न राहिल्याने अखेर ईडीने त्यांच्या घरी येऊन कारवाई केली. १ ऑगस्टला तब्बल ९ तास घरी आणि ८ तास ईडी कार्यालयात संजय राऊतांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना रात्री उशिरा अटक झाली. सुरूवातीला त्यांना ४ ऑगस्टपर्यंत म्हणजेच आजपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, आज त्यांच्या कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली. घडलेल्या या साऱ्या प्रकारावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार गप्प का असा सवाल, माजी मंत्री छगन भुजबळ यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सूचक उत्तर दिले.

महाविकास आघाडीची स्थापना करण्यात शरद पवार आणि संजय राऊत हे दोन नेते आघाडीवर होते. त्यामुळे, राऊतांवर ईडीने कारवाई केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गप्प का, असा सवाल विचारला जातोय. यावर छगन भुजबळ म्हणाले, “असे काही नाही. लोकसभेत ईडीच्या कारवायां संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खासदार सुप्रिया सुळे देखील याबद्दल आपली आक्रमक भूमिका मांडत आहेत. अनेक विरोधी पक्षांनी म्हंटलं आहे की हा कायदा राक्षसी आहे. हा कायदा युपीएच्या काँग्रेसच्या काळातच बनवला गेला आहे. चिदंबरम यांनीच या संदर्भातील कायदा बनवला होता. त्यामुळे या संदर्भात भाजपला तरी काय नावं ठेवणार?”

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:44 PM 04-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here