सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांच्याकडून प्रभाग ५ मध्ये तिरंगा वाटप

0

रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने भारताच्या देदीप्यमान इतिहासाचे संस्मरण करण्यासाठी दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे घरोघरी तिरंगा हे अभियान राबवण्यात येत आहे. रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या उपक्रमाला प्रतिसाद देण्यासाठी सहकार्य करायचे ठरवले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावतीने प्रभाग ५ मध्ये १००१ राष्ट्रध्वज घरोघरी जाऊन मोफत वाटण्यात येणार आहेत.

या उपक्रमाचा आज शुभारंभ करण्यात आला असून जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले आहे. प्रशासनाकडून १००१ झेंडे विकत घेऊन सौरभ मलुष्टे ते घरोघर मोफत वाटणार आहेत. प्रभागातील नागरिकांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले आहे. या राष्ट्रध्वजासोबत एक पत्रक देखील देण्यात येत असून यात राष्ट्रध्वज फडकावण्याचे नियम आणि सूचना देण्यात आल्या आहेत.

तरुण उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख असणाऱ्या सौरभ मलुष्टे यांनी आजवर शासनाचे लोकहिताचे अनेक उपक्रम राबवले आहेत. जेष्ठ नागरिकांसाठी लसीकरण मोहीम घेऊन त्यांनी नागरिकांची वाहवा मिळवली होती. मदतीची भावना ठेऊन आजवर अनेक गरजूंच्या मदतीला सौरभ मलुष्टे धाऊन गेले आहेत. कोणताही स्वार्थ मनात न ठेवता लोकांच्या हाकेला धावून जाणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख असून आपल्या या कीर्तीला साजेसे असे काम करीत घरोघरी राष्ट्रध्वज पोहचवण्याचा अभिनव उपक्रम आज त्यांच्याकडून होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
6:12 PM 04-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here