रिक्षाचालकांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0

रत्नागिरी : रिक्षाचालकांच्या विविध समस्यांबाबत रत्नदुर्ग रिक्षा व्यवसाय संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना हातावर पोट असणाऱ्या रिक्षाचालकाला आजही गंभीर समस्यांना समोर जावे लागत आहे. केंद्र, राज्य सरकारने रिक्षाचालकांच्या माथी जाचक अटी मारल्यामुळे रिक्षाचालक आर्थिक खाईत लोटले जात आहेत. त्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, रिक्षाचालकांवर उपोषणासारखी वेळ आपण येऊ देऊ नये, असे निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या या निवेदनाची प्रत आरटीओ, जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही देण्यात आली आहे.

अनेकवेळा उपोषणे करून आणि निवेदने देऊनही अद्याप गांभीर्याने दखल घेतलेली नाही. या सर्व समस्यांबाबत प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केली. त्याचीदेखील दखल संबंधित कार्यालयाच्या अधिकार्यांनी घेतलेली नाही. आता न्याय्य हक्कांसाठी येत्या स्वातंत्र्यदिनी उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रताप भाटकर आणि सेक्रेटरी राजेंद्र घाग यांनी दिला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:03 PM 05-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here