रत्नागिरी जिल्हा पोलिस पाटील संघाची कार्यकारणी जाहीर

0

लांजा : रत्नागिरी जिल्हा पो.पाटील संघाची नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून जिल्हा अध्यक्षपदी विश्वनाथ पाटील यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे.

याबाबत संघटनेची बैठक नुकतीच संगमेश्वर तालुक्यातील गोळवलकर गुरुजी सभागृहात पार पडली. महाराष्ट्र राज्य गा.का.पो.पा.संघ.राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या सल्ल्यानुसार रत्नागिरी जिल्हा पो.पाटील संघाच्या जिल्हा कार्यकारणीची निवड राज्य सचिव कमलाकर मांगले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी कोकण संघटक मारुती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर सभेचे अध्यक्ष राज्य सचिव मांगले यांनी नुतन कार्यकारणी निवड प्रक्रियेला सुरुवात करून उपस्थित सर्व सदस्य व तालुका अध्यक्षांनी निवड जाहीर करण्यापूर्वी मागील काळात विश्वनाथ पाटील यांनी जिल्हा अध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतल्यापासून संपूर्ण जिल्हा पिंजून काढून प्रत्येक पोलीस पाटीलांच्या सुख-दु:खातव अडीअडचणी सोडविण्यासाठी तत्परतेने धाऊन आले आहेत.

पोलीस पाटीलांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांनाच पुन्हा जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करावी अशा सुचना मांडल्या व त्यांना उपस्थितांनी अनुमोदन दिले. या बैठकीत निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे कार्याध्यक्ष: प्रकाश वागजे , (ता.दापोली) सचिव म्हणून. निलेश गुरव (शिरवली, ता.खेड) खजिनदार:. रविंद्र कोटकर (गवाणे,ता.लांजा), संघटक म्हणून जयंत फडके (जांभुळआड, ता.रत्नागिरी) महीला संघटक:-सौ. प्रिया बंदरकर.(बसणी,ता.रत्नागिरी)प्रसिध्दी प्रमुख म्हणून अनंत पाध्ये (गोळवली, ता.संगमेश्वर) सल्लागार: प्रकाश धोंडू बेंद्रे. (कोचरी ता.लांजा) श्रद्धा सरपोतदार (अंजणारी लांजा,). इरफान दळवी. (ता.गुहागर) सुरेश दळवी. (बाणकोट, ता.मंडणगड) यांची तर उपाध्यक्षपदी आत्माराम मंडलिक( सुकोंडी ता.दापोली), चंद्रकांत कदम (वाडीबीट ता.खेड), महेश भाटकर (अबलोली,ता.गुहागर) अनिल जाधव. (उक्षी,ता.रत्नागिरी), केशव गुण्ये.(चाफेंट,ता.लांजा) यांची निवड करण्यात आली आहे.सहसचिव म्हणून अमोल दळवी (खवटी-पाखर,ता.खेड),अमर गोखले. (ताम्हणमळा,ता.चिपळूण), आशिष घोसाळकर. (घोसाळे ता.मंडणगड.), संतोष चव्हाण (ता.संगमेश्वर) यांची निवड करण्यात आली.

तसेच सर्वानुमते श्री. सत्यप्रकाश शंकर चव्हाण याची राज्य सदस्य म्हणून निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे पूर्वीच्या जिल्हा कार्यकारणीतील प्रकाश बेंद्रे-सचिव, श्री सत्यप्रकाश चव्हाण -खजिनदार,सौ.प्रिया बंदरकर संघटक, प्रकाश वागजे-उपाध्यक्ष, नितीन बेलोसे-उपाध्यक्ष, इरफान दळवी-उपाध्यक्ष, विकास पारकर-उपाध्यक्ष, श्रीमती श्रद्धा सरपोतदार-उपाध्यक्षा, सुरेश दळवी सहसचिव, निलेश गुरव-सहसचिव, श्रीमती शैलजा अनिल पवार सहसचिव या पदाधिका-यांना कामकाजात उत्तम सहकार्य केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:21 PM 05-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here