राजापुरात उद्या करिअर मार्गदर्शन मेळावा

0

राजापूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राजापूर पोलीस ठाणे आणि सागरी पोलीस ठाणे नाटे यांच्या विद्यमाने यूपीएससी, एमपीएससीसह इतर स्पर्धा परीक्षांना उपयुक्त ठरेल असा करिअर मार्गदर्शन मेळावा शनिवार दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता राजापूर जवाहर चौकातील पिकअप शेड येथे आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याला रत्नागिरी, खंडाळाचे माधव विश्वनाथ अंकलगे, सचिन पांडुरंग कामतेकर राजापूर हायस्कूल व राजापूर पंचायत समितीचे शिक्षक सुभाष देसाई हे मार्गदर्शन करणार आहेत. जास्तीत जास्त संखेने विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here