जिल्ह्यातून इन्स्पायर्ड अवॉर्डसाठी विद्यार्थ्यांचे जास्तीत-जास्त नामांकन व्हावे : रमेश कोरे

0

रत्नागिरी : जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून रा. भा. शिर्के प्रशाला येथे जिल्ह्यातील विज्ञान शिक्षकांसाठी इन्स्पायर्ड अवॉर्ड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला विज्ञान सल्लागार कोल्हापूर विभाग रमेश कोरे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी श्री. कोरे यांनी आपल्या शाळांनी इन्स्पायर्डसाठी नामांकन कसे करावे, या विषयी माहिती दिली. इन्स्पायर्ड वॉर्डचे स्वरुप, महत्व व गरज, जिल्हा राज्य व राष्ट्रीय पातळीवरील मूल्यमापन प्रक्रिया, विद्यार्थी व शिक्षकांना इन्स्पायर्ड अवॉर्डचे होणारे फायदे याविषयी मार्गदर्शन केले व रत्नागिरी जिल्ह्यातून यासाठी विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त नामांकन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ३०० विज्ञान शिक्षक उपस्थित होते. श्री. कोरे यांचे जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाच्या वतीने अध्यक्ष रवींद्र इनामदार यांनी पुस्तक आणि पुष्प देऊन स्वागत केले. तसेच शिर्के प्रशालेच्या वतीने पुष्प आणि पुस्तक दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र गावंड जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांनी केले.

या वेळी उपशिक्षणाधिकारी गोपाळ चौधरी, प्रभारी मख्याध्यापक रमेश चव्हाण, जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे कार्यवाह प्रभाकर सनगरे, विज्ञान मंडळाचे तालुकाध्यक्ष राजन रहाटे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here