‘हम दो केंद्र में, हमारे दो महाराष्ट्र में’; शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदींचा भाजपाला सणसणीत टोला

0

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय सत्तानाट्यात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी झाला.

सरकार स्थापन होऊन ३६ दिवस झाले तरीही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची एका महिन्यात ६ हून अधिक वेळा दिल्ली वारी झाली. अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहुर्त मिळाला नाही. परंतु शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची ५ ऑगस्ट ही तारीख पुढे आली परंतु सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर त्यावरही ग्रहण लागल्याचं दिसून येत आहे. यावरूनच शिवसेनेने मोदी सरकार आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.

“हम दो केंद्र में , हमारे दो महाराष्ट्र में… हे रिमोट कंट्रोलवर चालणारं सरकार” असं म्हणत हल्लाबोल केला आहे. शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपाला सणसणीत टोला लगावला आहे. तसेच हे सरकार अवैध असल्याची सर्वाधिक जाणीव भाजपाला आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार थांबलेला आहे असंही म्हटलं आहे. “हम दो केंद्र में, हमारे दो महाराष्ट्र में या नीतीने कुठलेही सरकार फार काळ टिकत नाही 40 जणांनी बंडखोरीचा मार्ग निवडला, हे सर्व विश्वासघातकी लोक आहेत. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार सातत्याने लांबणीवर पडत आहे.”

“सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या गोष्टी पाहिल्यात तरी लगेच लक्षात येईल की बंडखोरांबाबत जनतेसोबतच न्यायव्यवस्थेचे काय मत झाले आहे. पण वाईट याच गोष्टीचं वाटतं की, या लोकांच्या स्वार्थामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं चांगलं सरकार सत्तेबाहेर पडले. हे सरकार अवैध असल्याची सर्वाधिक जाणीव भाजपाला आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार थांबलेला आहे. कोणाला मंत्रिमंडळात घ्यावं आणि कोणाला बाहेर थांबवावं असा प्रश्न आहे. या प्रश्नावरुन हे सरकारही कोसळू शकतं, हे रिमोट कंट्रोलवर चालणारं सरकार आहे” असं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:09 PM 05-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here