रत्नागिरीत १५ ऑगस्टपासून निमंत्रित कबड्डी स्पर्धा

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने पावसाळी पुरुष व महिला खुला गटाच्या निमंत्रित कबड्डी स्पर्धा दि. १५ ते १८ ऑगस्ट या कालावधीत रत्नागिरी जिल्हा मोटार मालक असोसिएशनच्या आयोजनाखाली साळवी स्टॉप, रत्नागिरी येथेसायंकाळी सहा वाजता घेण्यात येणार आहे.

पुरुष व महिला गटांचे सामने बाद पद्धतीने घेण्यात येणार असून, महिलांचे सामने दि. १७ ते दि. १८ रोजी सायंकाळी सहा वाजता घेण्यात येतील.

पुरुष व महिला विजेत्या संघास रु. २५ हजार इतकी रक्कम तसेच कायमस्वरुपी चषक व उपविजेता संघास २० हजार व कायमस्वरूपी चषक असे पारितोषिक असून, वैयक्तिक अष्टपैलू, उत्कृष्ट पकड व उत्कृष्ट चढाई खेळाडूंना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तालुका बाहेरील संघाना एक वेळचे रेल्वे, एस.टी. भाडे देण्यात येणार असून, निवास व भोजनाची व्यवस्था आयोजकांमार्फत केली जाणार आहे.

या जिल्हा कबड्डी स्पर्धेमध्ये जे संघ भाग घेणार आहेत, त्या संघांनी दि. १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत महेश सुर्वे, दीपक गावडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here