‘महानेट’च्या अनधिकृत कामकाजाबाबत माहीती अधिकार महासंघ चे लाक्षणिक उपोषण

0

रत्नागिरी : शासनाच्या महानेट प्रकल्पचे अनधिकृत काम या अगोदर कित्येक वेळीं शासनव्यवस्था च्या निदर्शनास माहिती अधिकार महासंघ ने वारंवार दिले आहे. स्टरलाइट टेक्नॉलॉजी कंपनी च्या मुजोर ठेकेदारांनकडून वारंवार नियमाचे उल्लंघण होताना दिसत आहे. त्यात अधिकार वर्ग त्यांच्यावर कोणतेही कार्यवाही करताना दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग, राजापूर, आणि सार्वजनीक बांधकाम विभाग रत्नागिरी उत्तर विभाग, तहसिल राजापूर, माहिती तंत्रज्ञान विभाग रत्नागिरी या कडून कोणतीही कार्यवाही आजतागायत होताना दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग राजापूर यांकडून अनेक पत्र देऊन सुध्दा स्टरलाइट कंपनी किव्हा त्यांच्या अधिकारी वर्गाने शासनाच्या आदेश्याला केराची टोपली दाखवली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वारंवार समनधित कंपनीला साइड पट्टीवरील आणि गटार लाईन मधील पोल कडून इतरत्र हलवावे अश्या प्रकारचे सूचना देवूनही कोणतीही हालचाल होत नाही. रस्त्यावरील दुतर्फा बसविण्यात आलेले पोल आणि त्यावरून फिरविण्यात आलेली लाईन यामुळे अपघात होण्याची भीती बांधकाम विभागाकडून सुद्धा लेखी स्वरूपात वरिष्ठ कार्यलयात देऊनही समनधित कंपनी मूग गिळून गप्प आहे.

या सर्व कारणांमुळे आणि न्याय पासून वंचित राहिल्यामुळे माहिती अधिकार महासंघ चे महाराष्ट्र राज्य सचिव श्री.समीर विजय शिरवाडकर यांच्या नेतृत्वाखाली माहिती अधिकार महासंघ चे जिल्यातील कार्यकर्ते १५ ऑगस्ट २०२२ स्वतंत्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यलाय समोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:52 PM 05-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here