मंकीपॉक्सचा वाढता धोका, अमेरिकेत आरोग्य आणीबाणी जाहीर

0

जगभरात मंकीपॉक्सचा वाढता प्रार्दुभाव पाहायला मिळत आहे.

भारतासह अमेरिकेतही मंकीपॉक्सचा धोका वाढताना दिसत आहे. अमेरिकेत मंकीपॉक्सच्या रुग्णांच्या मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत आरोग्य आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेमध्ये गुरुवारी 6 हजार 600 मंकीपॉक्सच्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे अमेरिकेच्या प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. प्रशासन हाय अलर्टवर असून योग्य उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न करत आहे.

अमेरिकेने गुरुवारी मंकीपॉक्स विषाणू संसर्गाला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केलं आहे. या घोषणेमुळे या मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी फेडरल निधी आणि संसाधनांचा वापर करण्यात मदत होईल. AFP वृत्तसंस्थेनुसार, आरोग्य सचिव जेवियर बेसेरा यांनी सांगितलं आहे की, ‘आम्ही मंकीपॉक्स विषाणूचा सामना करण्यासाठी तयार आहोत. आम्ही अमेरिकेतील प्रत्येक नागरिकाला मंकीपॉक्स गांभीर्याने घेण्यास आणि या विषाणूचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आवाहन करतो. यासाठी प्रशासन योग्य ती मदत करेल.’

अमेरिकेमध्ये गुरुवारी 6 हजार 600 मंकीपॉक्स विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. यामधील सर्वाधिक रुग्ण न्यूयॉर्कमधील आहेत. न्यूयॉर्कमध्ये एक चतुर्थांश रुग्णांची नोंद झाली आहे. आणखी रुग्णांनी नोंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेमध्ये आरोग्य आणीबाणी लागू करण्यात आली आहे. ही आरोग्य आणीबाणी 90 दिवसांसाठी लागू करण्यात आली आहे. अमेरिकेमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा सर्वाधिक उद्रेक न्यूयॉर्ख आणि सॅनफ्रिन्सिस्कोमध्ये झाल्याचं आढळलं आहे.

भारतात नऊ जणांना मंकीपॉक्सची लागण

देशात मंकिपॉक्सच्या एकूण रुग्णांची संख्या नऊवर पोहचली आहे. या रुग्णांमध्ये आठ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. राजधानी दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचे चार रुग्ण आढळले आहेत, तर पाच रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. दिल्ली आणि केरळमधील प्रत्येकी एका रुग्णांला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर केरळमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

मंकीपॉक्सवर लवकरच येणार लस

सीरम इन्स्टिट्यूटचे (SII) सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितलं आहे की, ‘लवकरच मंकीपॉक्स लस उपलब्ध होईल. त्यावर संशोधन सुरु आहे. गेल्या काही महिन्यांपासून मंकीपॉक्सचा विषाणू जगातील अनेक देशांमध्ये वेगाने पसरत आहे. आता भारतातही मंकीपॉक्स विषाणूची अनेक प्रकरणं समोर आली आहेत, अद्याप अनेक रुग्णांचा अहवाल येणं बाकी आहे. सीरमकडून लस तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काही महिन्यांत लस उपलब्ध होईल.’

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:52 PM 05-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here