मुंबई : जून महिन्यामध्ये शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर ४० हून अधिक आमदारा एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर पक्षात झालेली बंडाळी मोडीत काढत पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सक्रियपणे पक्षकार्यास सुरुवात केली होती. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.
उद्धव ठाकरेंनी सामनाच्या संपादकपादाची जबाबदारी पुन्हा स्वीकारल्यानंतर मनसेने टोला लगावला आहे. “सामना”च्या मुख्य संपादकाची धुरा उद्धव ठाकरेंकडे…आता नुसते “टोमणे” हा सामना नाही…हा टोमणा, असं म्हणत मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी टोला लगावला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
6:20 PM 05-Aug-22
