मुंबई : देशात काँग्रेसची आंदोलनाची नौटंकी सुरु असून केवळ एका कुटुंबाला खुश करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी केला.
जनतेच्या समस्यांसाठी आंदोलन होत असेल, शासनाला, केंद्र शासनाला सूचना करायच्या असतील तर विरोधी पक्षाला कोणी अडवलेले नाही. विरोधी पक्षाला लोकशाहीत आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे असं त्यांनी सांगितले. यांना राजकीय दृष्ट्या बेरोजगारी आल्याचे लक्षात येताच त्याची चिंता त्यांना लागली आहे. इतर देशांपेक्षा भारतातील महागाई आटोक्यात आणण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे. त्यांच्या उपाय योजना सुरु आहेत. ते संवेदनशील आहेत, असं दरेकर म्हणाले. तसेच काँग्रेस करंत असलेले आंदोलन हे एका कुटुंबासाठी सुरु आहे आणि हा प्रकार केविलवाणा असल्याचे ते म्हणाले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
6:20 PM 05-Aug-22
