भोस्ते घाटात मालवाहू ट्रक उलटला

0

खेड : मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर होत असलेलया अपघातांची मालिका अद्याप थांबलेली नाही. शुक्रवारी सकाळी घाट उतरत असताना या अवघड वळणावर एक मालवाहू ट्रक उलटला. या अपघातात चालक आणि क्लीनर दोघेही जखमी झाले आहेत.

सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथून दगडी कोळसा भरून महाड औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी निघालेला ट्रक सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील भोस्ते घाटात आला. भोस्ते घाट उतरत असताना ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाले. चालकाच्या हे लक्षात आल्यावर त्याने तीव्र उतारावर असलेला ट्रक नियंत्रित करण्याच्या प्रयत्न केला मात्र अचानक समोर अवघड वळण आल्याने चालकाचे प्रयत्न अपुरे पडले आणि तो ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला.

या अपघातात ट्रक चालकाच्या डोक्याला तर क्लीनरच्या पायाला मार लागून दोघेही जखमी आले. जखमी चालकाला तात्काळ नजीकच्या कळंबणी उजाळा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
6:20 PM 05-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here