लांजा नगरपंचायत प्रभाग ६ व प्रशासनाच्या वतीने प्रभागवासियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप Whatsapp ग्रुपच्या संकल्पनेने

0

लांजा : आज संपूर्ण जगालाच हादरवून सोडणाऱ्या करोना व्हायरसने रत्नागिरी जिल्ह्यातही भितीचे वातावरण निर्माण झाले. अशा परिस्थितीत लांजा नगर पंचायत प्रभाग ६ मध्ये मात्र स्थानिक नगरसेवक श्री प्रसाद प्र. डोर्ले यांनी प्रभाग ६ मधील आपल्या मित्र मंडळाच्या वतीने आणि सरकारी यंत्रणेच्या सहकार्याने प्रभाग ६ वासियांना घाबरून न जाता सहकार्य करण्याचे आवाहन केले. याकाळात लांजा प्रभाग ६ वासियांना व जवळच्या इतर प्रभागामधील जवळपास ३५० ते ४०० कुटुंबियांना औषधे, दूध, भाजीपाला, किराणामाल, अंडी, चिकन इ. जीवनावश्यक वस्तूंच्या मागणी नुसार पुरवठा करण्यासाठी एक Whatsapp ग्रुप बनवून त्यानुसार सेवेला सुरूवात केली. त्याकरिता नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारे श्री. संतोष आग्रे व कुटुंबीयांनी सेवा केंद्राकरिता आपले गणेश मंगल कार्यालय आणि मनुष्यबळ उपलब्ध करून दिले. त्यामुळेच लांजा न.प. प्रभाग ६ हा सर्वात प्रथम यंत्रणांशी सहकार्य आणि समन्वय ठेवून जनजागृती व जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणारा लांजा तालुक्यातील एक आदर्श प्रभाग ठरला आहे. याकामी मा. ना. उदयजी सामंत, मा. खासदार विनायक राउत, मा. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मा. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, मा. आ. राजन साळवी, मा. नगराध्यक्ष श्री. मनोहर बाईत, मा. तहसिलदार लांजा पाटिल मैडम, मा. पोलिस निरीक्षक श्री. चौधर साहेब, मा. मुख्याधिकारी लांजा न.प. श्री. बाबर साहेब, लांजा आरोग्य अधिकारी मा.श्री. कोरे साहेब आदि यंत्रणांचे सहकार्य मिळत असल्याने लांजा प्रभाग ६ चे नगरसेवक श्री. प्रसाद डोरले व प्रभागवासियांनी समाधान व्यक्त केले आणि सर्वांना धन्यवाद दिले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:48 PM 03-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here