उपराष्ट्रपती पदासाठी मतदानाला सुरुवात, पंतप्रधान मोदींचं सर्वात पहिले मतदान

0

नवी दिल्ली : देशाच्या पुढील उपराष्ट्रपतीची निवड करण्यासाठी आज मतदान होत आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर, आजच मतमोजणीही होऊन निवडणुकीचा निकालही जाहीर होणार आहे. उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएने जगदीप धनखड तर विरोधी पक्षाने मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी दिली आहे.

पंतप्रधान मोदींनी केलं मतदान –
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे. व्यंकय्या नायडू यांच्यानंतर देशाचे पुढील उपराष्ट्रपती कोण होणार, हे चित्रही आजच स्पष्ट होईल. सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत पोहोचत सर्वात पहिले मतदान केले. संसद भवनात मतदानासाठी खासदारांची रांग गालली आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान चालेल. यानंतर आजच निवडणुकीचा निकालही येईल.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 06-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here