रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात आता सर्वत्र काटेकोरपणे नियमांचं पालन केले जात आहे. पोलिसांकडून देखील जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणाऱ्यांना पासेस देण्यात आले आहेत. दरम्यान, यावेळी कशाप्रकारे काम सुरू आहे याचा आढावा घेण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत रस्त्यावर उतरले होते. यावेळी त्यांनी स्वतः नागरिकांकडे पासेस आहेत का? याची चौकशी देखील केली. शिवाय, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा असे आदेश देखील यावेळी सामंत यांनी पोलिसांनी दिले आहेत. सध्या रत्नागिरी शहराचा विचार करता पोलिसांच्या साथीनं जवळपास 40 पोलीस मित्र देखील घराबाहेर पडणाऱ्यांची चौकशी करत साऱ्या स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
1:16 PM 03-Apr-20
