आंबा उत्पादकांचा ९ ऑगस्टला रत्नागिरीत मेळावा

0

रत्नागिरी : कोकण हापूस आंबा उत्पादक आणि विक्रेते सहकारी संस्था तसेच ओबीसी संघर्ष समितीतर्फे येत्या मंगळवारी (दि. ९ ऑगस्ट) रत्नागिरीत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आयोजकांतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.

शेतकऱ्यांच्या आणि इतर अनेक समस्याची जाणीव करून देण्यासाठी हा मेळावा होणार आहे. रत्नागिरीच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये सकाळी साडेदहा वाजता मेळावा सुरू होईल. शेतकऱ्यांच्या या आणि इतर अनेक समस्यांबाबत जाणीव करून देण्यासाठी शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे.

गेली १५ ते २० वर्षे कोकणातील आंबा, काजू, नारळ, सुपारी, चिकू इत्यादी पिकांवर नैसर्गिक संकटे आली आहेत. अनेक वेळा वादळ, अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन, सर्वसामान्य शेतकरी उद्ध्वस्त होऊन कर्जबाजारी झाले आहेत. सध्या बँका आणि वित्तीय संस्थांकडून शेतकऱ्यांची कायद्याचा दुरुपयोग करून मुस्कटदाबी केली जात आहे. या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 06-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here