चिपळूण येथील वाचनालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी वक्तृत्व स्पर्धेला प्रतिसाद

0

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.

प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत तालुक्यातील बहुसंख्य शाळा, महाविद्यालयातील स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धकांनी आपले मत चिकित्सक वृत्तीने व्यक्त केले. अवघड विषय सोपे करून मांडत आपले प्रावीण्य दाखविले.

स्पर्धेतील विजेते असे – महाविद्यालयीन गट – प्रथम – नाजिया खुद्दबुद्दिन कडवईकर (आनंदराव पवार कॉलेज), द्वितीय – सिद्धी आंब्रे (घरडा जी.आय.टी., लवेल), तृतीय – सुहानी संतोष साळवी (सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल). माध्यमिक गट – प्रथम – सानिका विकास परांजपे (युनायटेड इंग्लिश स्कूल), द्वितीय – सारिका संतोष घाणेकर (राजाराम राघोजीराव शिंदे माध्यमिक विद्यालय, ओवळी नांदिवसे), तृतीय – स्वरा मंगेश शिंदे (नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल मिरजोळी). प्राथमिक गट – प्रथम – स्वरांगी प्रमोद जोशी (युनायटेड इंग्लिश मीडियम स्कूल), द्वितीय – आसमी उल्हास कदम (नॅशनल इंग्लिश स्कूल, मिरजोळी), तृतीय – कल्याणी मंदार ओक (युनायटेड इंग्लिश स्कूल).

स्पर्धेचे महविद्यालयीन गटाचे परीक्षक म्हणून विनोद फणसे, संगीता जोशी, प्रा. संतोष गोणबरे यांनी काम पाहिले. माध्यमिक गटाकरिता स्नेहा सावर्डेकर, मंदार ओक, मंगेश मोने, तर प्राथमिक गटाकरिता सुनील पाध्ये, प्रवीण पवार, राजू सोहोनी यांनी परीक्षण केले. यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. उपस्थित सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. वाचनालयाचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here