रत्नागिरीतील ‘हेल्पिंग हॅण्ड’च्या तरुणांनी समाजकार्यात दाखवली तत्परता

0

रत्नागिरी : रत्नागिरीतील काही तरुणांनी एकत्र येत ‘एक हाक, एक हात, ना स्वतःसाठी, ना स्वार्थासाठी, फक्त गरजवंताच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन हेल्पिंग हॅन्डस नावाने चळवळ उभी केली आहे. देशावरील कोरोना संकटाविरोधात संपूर्ण देश लढत आहे. यात आपला हातभार असावा या हेतूने सामजिक जाणिवेतून अहोरात्र काम करणाऱ्या पोलिसांना २४ रोजी रत्नागिरीतील प्रत्येक नाक्यावर जाऊन चहा, बिस्कीट व पाण्याची बाटली देण्यात आली. यावेळी हेल्पिंग हॅन्डसचे शहाबाज गोलंदाज, संकेत कदम, अजिंक्य केसरकर, शौकत गोलंदाज इत्यादी उपस्थित होते. रुबा मुकादम, अंजली पिलणकर, किरण भालेकर, रिशा मुकादम, शीतल रावणंग, सुरेखा कुंभार, कौस्तुभ मयेकर, प्रणाली दहिहंडे, मुग्धा कुळ्ये व हेल्पिंग हॅन्डसचे सर्व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:36 PM 03-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here