पूरमुक्त चिपळूणसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा : आमदार शेखर निकम

0

चिपळूण : चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, दुसऱ्या टप्प्यातील गाळ काहीअंशी निघाला आहे. पहिला व तिसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे व या बाबत तातडीने बैठक लावावी. तिनही टप्प्यातील गाळ काढल्यास शहर पूरमुक्त होईल, असा विश्वास गोवळकोट येथे व्यक्त केला.

क्रेडाई राज्य संघटनेच्यावतीने चिपळुणातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या जीवरक्षक बोटीचे लोकार्पण जिल्हाधिकारी बी. एन. पाटील व आ. शेखर निकम यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.५) सायंकाळी झाले. गोवळकोट धक्का येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी आ. निकम बोलत होते.

या कार्यक्रमाला आ. शेखर निकम, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, क्रेडाईचिपळूणचे अध्यक्ष राजेशवाजे, सचिव संतोष तडसरे, सलीम मेमन चिपळुणातील बांधकाम व्यावसायिक, चिपळूण बचाव समितीचे बापू काणे, शिरीष काटकर, अरुण भोजने, संजीव अणेराव, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, इब्राहिम दलवाई, जाफर कटमाले, शाहनवाज शाह, कबीर काद्री व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्रीफळ व फीत कापून बोटीचे लोकार्पण झाले.

कार्यक्रमप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, चिपळणवासीयांच्या मेहनतीमळे हे शहर सावरले आहे. काही महिन्यातच चिपळूण उभे राहिले. त्यामुळे येथील लोकसहभाग मोठा आहे. शासनाची वाट न पाहता लोकांनी पूर परिस्थितीतून मार्ग काढला. त्यामुळे ही बोट आगामी काळात महत्त्वाची जबाबदारी बजावेल. मात्र, चिपळुणात पूर न येण्यासाठी आपण प्रयत्न करू असे सांगितले. आ. शेखर निकम यांनी, चिपळूण कायमचे पूरमुक्त कसे होईल, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:50 PM 06-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here