चीनमध्ये उद्या राष्ट्रीय शोकदिन

0

बिजिंग : कोरोनाच्या लढ्याचा पहिला इशारा देणारे डॉ. ली वेनलिआंग यांच्यासह कोरोनाच्या साथीत मरण पावलेल्या 3200 नागरिकांसाठी चीनमध्ये शनिवारी (दि. चार एप्रिल) राष्ट्रीय शोक दिन पाळण्यात येणार आहे. या दिवशी सर्व राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतील. देशातील आणि परदेशातील सर्व दुतावासातील सर्व कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतील. या धोक्‍याचा पहिल्यांदा इशारा देणारे देणारे त्याबद्दल पोलिसी कारवाईला सामोरे गेलेले आणि कोरोनामुळेच मृत्यूमुखी पडलेल्या डॉ. लि वेनलिआंग यांना हुतात्मा संबोधनाने सन्मानित करण्यात आले आहे, असे चीनच्या सरकारी वृत्त संस्थेने म्हटले आहे. ली यांच्यासह आठ डॉक्‍टरांनी आपले प्राण कोरोनाच्या विरोधातील लढ्यात गमावले आहेत. तर कोरोनाबाधितांशी संपर्क आलेल्या अन्य दोन वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही मरण पत्करावे लागले आहे, असे सरकारी मालकीच्या ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here