विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेकडून अंबादास दानवेंची वर्णी लागणार; अरविंद सावंत यांची माहिती

0

मुंबई : विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेकडून आमदार अंबादास दानवे यांची वर्णी लागणार आहे. दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती करावी अशी शिफारस उपसभापती यांच्याकडे शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

HTML tutorial

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांची नियुक्ती करावी अशी शिफारस उपसभापती यांच्याकडे केली आहे, अशी माहिती अरविंद सांवंत यांनी दिली आहे. याबरोबरच विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती होईल, असे देखील सावंत यांनी म्हटले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज शिवसैनिकांसोबत संवाद साधला. यावेळी अरविंद सावंत यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी अरविंद सावंत यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर अंबादास दानवे यांची नियुक्ती करावी अशी शिफारस उपसभापती यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती दिली.

“महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांशी विचारविनिमय करूनच निर्णय घेत आहोत. संख्येचा विचार केला तर संख्याबळ पण आमच्याकडे आहे, शिवाय आपसातील समन्वय देखील आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती होईल, असा विश्वास सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यातील रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून देखील सावंत यांनी यावेळी टीका केली. “बेकायदेशीर सरकारचं बेकायदेशीर मंत्रिमंडळ आहे, त्यापेक्षा वेगळी उपमा देता येणार नाही. इतका घाणेरडा प्रकार महाराष्ट्रात कधी घडला नाही. शेतकरी आत्महत्या करतोय, महिलांवर अत्याचार होत आहेत, परंतु जनतेला दिलासा देणारं कुठलं पाऊल सरकार उचलत नाही. हे असंविधानिक मुख्यमंत्री आहेत, असा टोला सावंत यांनी लगावला.

अरविंद सावंत म्हणाले, “टीईटीमध्ये अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे आली तर आता त्यांना सारवासारव करावी लागत आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावून दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:49 PM 08-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here