चला कर्णेश्वर-सोमेश्वराच्या दर्शनाला..!

0

रत्नागिरी : श्रावण म्हणजे धार्मिक, उपवास-व्रतवैकल्यांचा महिना आणि श्रावणी सोमवार तर शंकराच्या देवळात जाण्याचा दिवस!

HTML tutorial

मात्र, कामाच्या व्यापामुळे किंवा अन्य काही कारणाने, इच्छा असूनही जाता येत नाही अशांसाठी खास श्रावणी सोमवारी कर्णेश्वर-सोमेश्वराच्या दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

येत्या १५ ऑगस्ट रोजी देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन धूमधडाक्यात साजरा करत असतानाच श्रावणी सोमवारचा मुहूर्त साधून प्रसिद्ध कर्णेश्वर आणि सोमेश्वर मंदिरात शिवशंभोच्या दर्शनाचाही लाभ घेऊ शकणार आहात.

संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील कर्णेश्वर मंदीर आणि राजवाडीचं श्री सोमेश्वर मंदीर या पुरातन देवस्थानांमधली दगड व लकडावरील अप्रतिम कोरीवकाम शिवाय, राजवाडीतील नैसर्गिक गरम पाण्याच्या कुंडाचा अनोखा अनुभव घेता येणार आहे.
उपवासाची खिचडी-कोशिंबिरीसह रत्नागिरीहून संगमेश्वर आणि परत रत्नागिरी शहरात सोडण्याच्या प्रवासखर्चासह प्रत्येकी फक्त ५०० रुपयात. वेळ सकाळी ९.३० ते दुपारी ३ पर्यंत अशी आहे.

तरी इच्छुकांनी शनिवार दिनांक १३ ऑगस्टपर्यंत आपला सहभाग नोंदवाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सतीश कामत 7499874054, अजिंक्य प्रभूदेसाई 7620262717 यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 09-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here