शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी, 18 मंत्री घेणार शपथ?

0

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होणार असून सकाळी 11 वाजता राजभवन या ठिकाणी 18 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे. यामध्ये शिंदे गटाचे सात मंत्री तर भाजपकडून 11 जणांचा शपथविधी होण्याची शक्यता असून आत्तापर्यंत 9 नावांवर भाजपकडून शिक्कामोर्बत झाल्याची माहिती आहे.

HTML tutorial

उर्वरित दोघांमध्ये एक महिला आमदार शपथ घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यसह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.

शिंदे गटाच्या सात जणांची यादी तयार, मंत्रिपदासाठी अनेकांची जोरदार फिल्डिंग
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर शिंदे सरकारला मुहूर्त सापडला आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी नंदनवन येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यात काही तास चर्चा झाली. शिंदे गटामध्ये मंत्रीपदासाठी जोरदार चुरस असल्याचं दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला मंत्रिपद मिळावं यासाठी अनेकांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या आज होणाऱ्या शपथविधीसाठी शिंदे गटाच्या सात जणांची यादी तयार असल्याची माहिती आहे. यामध्ये उदय सामंत, दादा भुसे, संजय शिरसाठ, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांचे नाव असल्याची माहिती आहे. शिंदे गटाकडून हे मंत्री आज शपथ घेणार आहेत. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवार यांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाजपच्या मंत्र्यांची यादी ठरली असून टप्प्याटप्प्याने त्यांच्याशी संपर्क साधला जात असल्याची माहिती आहे.

शिंदे गटाकडून हे मंत्री शपथ घेण्याची शक्यता
1) उदय सामंत
2) दादा भुसे
3) संजय शिरसाठ
4) संदीपान भुमरे
5) गुलाबराव पाटील
6) भरत गोगावले
7) शंभूराज देसाई
भाजपकडून हे मंत्री शपथ घेणार?
1) चंद्रकांत पाटील
2) राधा कृष्ण विखे पाटील
3) सुधीर मुनंगटीवार
4) गिरिष महाजन
5) सुरेश खाडे, मिरज
6) अतुल सावे
7) मंगल प्रभात लोढा
8) रवींद्र चव्हाण
9) विजयकुमार गावित

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 AM 09-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here