चिपळुणात पुरोगामी शिक्षक संघटनेतर्फे आज दुचाकी रॅली

0

चिपळूण : चिपळुणातील महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या माध्यमातून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यासाठी शहर परिसरातून अलोरेपर्यंत दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे.

HTML tutorial

रॅलीची सुरुवात ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. केली जाणार आहे. पुरोगामी शिक्षक संघटनेच्या माध्यमातून क्रांतीदिनी सकाळी १० वा. सांस्कृतीक केंद्रापासून दुचाकी रॅलीला सुरुवात होणार आहे. ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

रॅलीमध्ये दुचाकीसह तिरंगा झेंडा सोबत घेऊन सांस्कृतीक केंद्र, खेर्डी, पिंपळी, मुंढे, शिरगाव, अलोरे, चिपळूण पं.स.अशा भागातून निघणाऱ्या रॅलीत सहभागी व्हावे, होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 09-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here