मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, नाराजी दूर करण्यासाठी…

0

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होत आहे. मंत्रिमंडळात कोणा-कोणाची वर्णी लागणार यावरून राजकीय चर्चा सुरू असताना नाराजीचे सूरही उमटू लागले आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या या नाराजी नाट्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची प्रतिक्रिया आली आहे. मंत्रिमंडळ विस्तार होतो, त्यावेळी नाराजी नाट्य होतचं, असं अजित पवार म्हणाले.

अपक्ष आमदारांना पहिल्या विस्तारात स्थान नाही
शिंदे गटाकडून आणि भाजपकडून अपक्ष आमदारांना आजच्या आणि पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान नाही, अशी चर्चा आहे. बच्चू कडू, अशीष जैस्वाल यांच्यासह अनेक अपक्ष आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. यामुळे त्यांच्यात नाराजी शक्यताही व्यक्त केली जात असल्याची चर्चा आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय. कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन करून आपल्याला निमंत्रण दिलंय. आपण उपस्थित राहणार आहे. आपण एवढं काम केलं. आणि तरी मंत्रिमंडळात स्थान नाही, अशी नाराजी असते. मंत्रिमंडळ विस्तारावेळी नाराजी निर्माण होतेच. पण आजचा मंत्रिमंडळ विस्तार हा छोट्या स्वरुपाचा आहे. पुढे मोठ्या स्वरुपात मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. आमदारांची नाराजी दूर केली जाऊ शकते, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 09-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here