उदय सामंतांनी मंत्रीपदाची शपथ घेताच शिवसेना तालुकाप्रमुख बंड्या साळवींना झाला आनंद

0

रत्नागिरी : आज सकाळी ११ वाजता शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना देखील शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.

HTML tutorial

आज सकाळी आ. उदय सामंत यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच रत्नागिरीतील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. नाक्यानाक्यावर फटाके वाजवून पेढे वाटले. उदय सामंत शिंदे गटात सामील झाल्यावर तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उदय सामंत यांच्यासोबत राहिले मात्र काही पदाधिकार्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय जाहीर केला होता. याचदरम्यान शिवसेनेने घेतलेल्या मेळाव्यात फक्त खा. विनायक राऊत यांनीच उदय सामंत यांच्यावर टोकाची टीका केली मात्र इतर पदाधिकार्यांनी ब्र देखील काढण्याचे टाळले होते. उदय सामंत यांचे प्रत्येक पदाधिकार्याशी असलेले संबंध आज देखील टिकून असल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेना तालुका प्रमुख बंड्या साळवी यांच्या सोबत देखील उदय सामंत यांचे सबंध आजदेखील टिकून असल्याची चर्चा आहे. उदय सामंतांची मंत्रिमंडळात लागलेल्या वर्णी मुळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन बघितले तर मला खूप आनंद झाला आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी दिली आहे. एकंदर काय तर कट्टर शिवसैनिकांच्या समुहात भयाण शांतता असताना तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या प्रतिक्रियेने अनेकजण बुचकळ्यात पडले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
6:40 PM 09-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here