रत्नागिरी : काल रत्नागिरी राजिवडा येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यावर शहरात खळबळ उडाली. प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिले आहेत. ज्या व्यक्ती आपली माहिती लपवत आहेत व अशा व्यक्तींना जे कोणी आश्रय देत आहेत अशांवर देखील गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
