जिल्हाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे महावितरण कंपनीला पन्नास लाखांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी आलेल्या पुरामुळे हे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. मुसळधार पावसामुळे आणि आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील 443433 ग्राहक बाधित झाले होते. अनेक ठिकाणचे पोल आणि तारा तुटल्या होत्या. 33 केव्ही चे 31 फिडर बंद झाले होते त्याचबरोबर 4870 ट्रान्सफॉर्मर बंद पडले होते. अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रभाकर पेटकर यांनी दिली आहे. जिल्ह्यातील सर्व विद्युत पुरवठा सुरळीत काम करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी झटत असून लवकरात लवकर सर्व ठिकाणचा वीज प्रवाह सुरळीत करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.