खा. विनायक राऊत यांच्या खासदार निधीतून ३२ लाखांच्या निधीला मिळाली प्रशासकीय मान्यता

0

रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा श्री विनायक राऊत यांच्या माध्यमातून खासदार स्थानिक विकास निधीतून रत्नागिरीसाठी कोव्हीड- १९ संसर्ग प्रतिबंध व नियंत्रण उपाययोजने करीता मास्क खरेदीसाठी ३२ लाख रुपये निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व आरोग्य सेवेतील कर्मचारी यांच्यासाठी N 95 मास्कसाठी १७ लाख रुपये निधी व रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरोग्य व सफाई कर्मचारी व ग्रामदक्षता समितीचे स्वयंसेवक यांना कापडी मास्क ७५ हजार पुरविण्यात येणार आहेत. यासाठी १५ लाख रुपये मंजुर करण्यात आले आहेत. असे एकूण ३२ लाख रुपये खासदार मा श्री विनायक राऊत यांच्या माध्यमातून खासदार स्थानिक विकास निधीतून मास्क वाटप करण्याची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here