मालगुंड येथील नारळाच्या बागेत बेकायदेशिरपणे गावठी दारु विक्री करणार्‍याविरोधात कारवाई

0

रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड येथील नारळाच्या बागेत बेकायदेशिरपणे गावठी दारु विक्री करणार्‍याविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1.25 वा.करण्यात आली.

हेमकांत सत्यविजय पवार (37, रा.भवतीनबर निवेंडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात महिला पोलिस नाईक वंदना कमलेश लाड यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी दुपारी हेमकांत भाटलेवाडी येथील नारळाच्या बागेत बेकायदेशिरपणे 500 रुपयांची 10 गावठी दारु विक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. अधिक तपास पोलिस हवालदार जाधव करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:20 PM 11/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here