राज्यातील विविध जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या तसेच विषय समिती सभापतीपदाच्या निवडणुका तात्पुरत्या लांबणीवर टाकण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडणुकाही काही काळासाठी लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्यातील विविध जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या तसेच विषय समिती सभापतीपदाच्या निवडणुका आणि पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडणुका काही काळासाठी लांबणीवर टाकण्यात आल्या.
