पोलीस व आरोग्य यंत्रणेसोबतची दादागिरी खपवुन घेणार नाही; आमदार राजन साळवी यांचा सज्जड दम

0

कोरोना विषाणुमुळे भारतात हाहाकार माजला असताना महाराष्ट्रातही कोरोना बाधितांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता रात्रंदिवस झगडणा-या आरोग्य व पोलीस प्रशासनासोबत जर कोणी दादागिरी करत असेल तर त्यांची दादागिरी मोडून काढायला प्रशासनासोबत रस्त्यावर उतरु असा सज्जड दम राजापुर लांजा साखरपाचे आमदार राजन साळवी यांनी प्रशासनाला सहकार्य न करणा-यांना दिला आहे. कोकणात सुरुवातीला बाहेरुन आलेला एक रुग्ण आढळला होता त्यानंतर कोकण कोरोनामुक्त होत असतानाच दिल्ली येथील मर्कज या मुस्लीमांच्या धार्मिक कार्यक्रमातुन कोकणासह संपुर्ण महाराष्ट्रभर, भारतभर आलेल्या लोकांमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. नुकताच रत्नागिरी शहरातील राजिवडा भागात एक रुग्ण आढळुन आला तेथील माजी लोकप्रतिनिधीने आरोग्य यंत्रणेच्या कर्मचारी वर्गाला धमकावण्याचा प्रकार करुन परत पाठवले याचा मी तिव्र शब्दात निषेध करतो. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पोलीस व आरोग्य यंत्रणांवर अतिरिक्त ताण येवुन ते परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत असताना दिल्लीवरुन आलेले काही मुस्लीम बांधव हे प्रशासनाला सहकार्य न करता धर्माचे कारण पुढे करत दादागीरी करीत आहेत, हि वेळ आपल्या धर्माचा प्रसार नी प्रचार करायची नसुन देशाच्या हितासाठी जे जे योग्य करावे लागेल ते करायची आहे असे सांगत त्यांनी प्रशासनाला सहकार्य न करणारा कोणीही असो त्याच्यावर कडक कारवाई करा, लोकप्रतिनिधी म्हणुन आम्ही प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे राहु, असे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here