कोरोनारूपी अंधकाराला दूर सारण्यासाठी येत्या रविवारी रात्री 9 वाजता घरातल्या लाईट्स बंद करा आणि दिवे, मोबाईल टॉर्च आणि मेणबत्त्या लावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मात्र सगळ्यांनी एकाच वेळी वीज बंद केली तर राज्याच्या वीज निर्मिती प्रकियेला अडथळा येण्याची शक्यता आहे, अशी भिती राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे. सगळ्यांनी एकाच वेळेस लाईट बंद केल्यास राज्यातील तसेच केंद्रीय ग्रीड हाय फ्रिक्वेन्सीवर निकामी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे अशा विधानांचा पुनर्विचार व्हावा. तसेच लाईट बंद न करता दिवे लावावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे.
