ई पीक पाहणीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तहसीलदार जाधव यांनी जारी केले हेल्पलाईन नंबर

0

रत्नागिरी : शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा ई पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी 1 ऑगस्टपासून संपूर्ण राज्यात सुरू झाली आहे. यामध्ये आपल्या जमिनीतील उभ्या पिकाची पीक पाहणी करण्याची संधी शासनाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे.

या ई पीक पाहणी ॲपच्या जनजागृतीचे काम तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत गावोगावी चालू आहे. तालुक्यातील जास्तीत शेतकरी यांनी ई पीक पाहणी प्रकल्पात भाग घेऊन आपल्या जमिनीतील पीक पेरा ॲपच्या माध्यमातून स्वतः शेतकरी यांनी नोंदवावे यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ई पीक पाहणी करताना तालुक्यातील शेतकऱ्यांना, नागरीकांना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास त्याचे तात्काळ निरसन व्हावे यासाठी तहसीलदार रत्नागिरी शशिकांत जाधव यांनी एक हेल्पलाईन व्हॉट्सॲप नंबर जाहीर केला आहे.

या हेल्पलाईन व्हॉट्सॲप नंबरचा उपयोग करून शेतकरी ई पीक पाहणी करताना येणाऱ्या अडचणी पाठवू शकतात. तहसीलदार जाधव यांनी आवाहन केले आहे की, शेतकरी याना पीक पाहणी करताना अडचणी आल्यास आपले नाव, गावं व अडचणीचा तपशील लिहून 7517517008 या नंबरवर पाठवावे. यावेळी बोलताना तहसीलदार जाधव यांनी सांगितले की, या हेल्पलाईनवर आलेल्या अडचणीला प्रतिसाद देण्याचा कालावधी हा 72 तास इतका निश्चित करण्यात आला आहे. शंका विचारलेपासून 72 तासाच्या सदर अडचणीला सबंधित अधिकारी, कर्मचारी हे प्रतिसाद देतील आणि तात्काळ अडचणीचे निवारण करतील.

या हेल्पलाईन व्हॉट्सॲप नंबरचा वापर नागरीक Voter Helpline ॲपमार्फत आपले निवडणूक ओळखपत्र आधार लिंक करताना काही अडचणी आल्यास या सबंधित शंका सुध्दा नागरीक या हेल्पलाईन व्हॉट्सॲप नंबरवर विचारू शकतील.

तहसीलदार जाधव यांनी यानिमित्ताने तालुक्यातील सर्व शेतकरी, नागरीक यांनी जास्तीत जास्त ई पीक पाहणी व voter Helpline ॲपचा वापर करावा आणि काही अडचणी असल्यास 7517517008 या हेल्पलाईन व्हॉट्सॲप नंबरवर आपली शंका विचारण्याचे आवाहन केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 12/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here