खासगी डॉक्टरांना देखील विमा संरक्षण मिळावे : आ. शेखर निकम

0

चिपळूण : होमिओपॅथी डॉक्टरांना शासकीय सेवेत सामावून घ्या, अशी मागणी चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादर्भाव वाढतो आहे. अशा स्थितीत मतदारसंघातील सर्वच होमिओपॅथी डॉक्टरांनी बाह्यरूग्ण उपचार कक्ष सर्व रुग्णांसाठी योग्य ती खबरदारी घेऊन सुरू ठेवले आहेत. गेल्या काही दिवसांपासून खासगी डॉक्टरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रूग्ण तपासणी करताना आवश्यक ती साधने, कीट, मास्क, ग्लोज व सॅनिटायझर उपलब्ध नसल्यामुळे धोकादायक स्थितीनिर्माण होऊ शकते. ज्यामुळे डॉक्टर स्वतः संक्रमण अवस्थेत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या समस्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचा देखील विमा उतरविला जावा, अशी मागणी आ. निकम यांनी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:32 AM 04-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here