कै. मृणाल हेगशेट्ये स्मृति राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा 20 ऑगस्ट रोजी

0

रत्नागिरी : कै. मृणाल हेगशेट्ये स्मृती राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा यावर्षी 20 ऑगस्ट रोजी होणार आहे. ही स्पर्धा 3 गटामध्ये होणार असून, स्पर्धेसाठी दि. 19 ऑगस्टपर्यंत नाव नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्यावतीने ही स्पर्धा दरवर्षी भरविण्यात येते. राज्यभरातून या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असतो. ही स्पर्धा माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी जिल्हास्तरीय व वरिष्ठ गटासाठी राज्यस्तरीय होणार आहे. माध्यमिक गटासाठी इंग्रजी आणि मराठी या दोन्ही माध्यमातून स्पर्धा होणार असून, यासाठी स्वतंत्र बक्षिसे देण्यात येणार आहेत. माध्यमिक गटासाठी विषय याप्रमाणे- बापूजी आणि मुले, माझे समाजभान, समाज माध्यमे आणि कल्पकता, शिक्षणाचे नवे मार्ग.

कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी विषय याप्रमाणे-अवचटांची माणसं, माझ्या पहिल्या मताचा शोध आणि संविधान, अग्नीपथ आणि युवा आंदोलन, तंत्रज्ञान आणि आर्थिक केंद्रीकरण. राज्यस्तरीय वरिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी-महाराष्ट्राचे राजकारण आणि संविधानाची मूल्ये, कथाकार जी. ए. कुलकर्णी, कट्टरता की मानवता?, वसतीगृहाचे जनक छ. राजर्षि शाहू महाराज असे विषय आहेत.

शाळा, महाविद्यालयातर्फे केवळ 2 संघांनाच प्रवेश घेता येईल. यामध्ये गटामध्ये 2 विद्यार्थी असतील. या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे असून, 19 ऑगस्टपर्यंत नावे नोंदवावीत. अधिक माहितीसाठी प्राथमिक गटासाठी 8830372796, कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी 9403257581, वरिष्ठ गटासाठी 9049840113 यावर संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
06:43 PM 12/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here