Breaking : आठवडा बाजारात मोबाईल दुकान फोडताना चोरट्यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले

0

स्त्री वेष परिधान करून चोरटे करीत होते चोरी

रत्नागिरी : नागरिकांच्या आणि पोलिसांच्या सतर्कतमुळे आज पहाटे शहरातील आठवडा बाजार येथील चोरीची घटना उघडकीस आली आहे. आठवडा बाजार येथील एस एस मोबाईल मध्ये 13 ऑगस्ट रोजी पहाटे दोन च्या सुमारास दोन चोरट्यांनी दुकानाचे शटर फोडून आत प्रवेश केला. याचदरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांना दुकानाचे शटर उघडे असल्याचे दिसले. या संशयावरून त्यांनी बघितले असता दोन चोरटे चोरी करत असल्याचे दिसले. या घटनेच्या काही वेळ अगोदर एका रिक्षा चालकाला दोन संशयित व्यक्ती आठवडा बाजार येथे फिरताना दिसल्या होत्या. या रिक्षा चालकाने ही गोष्ट गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना सांगितली. ही माहिती मिळताच पोलीस आठवडा बाजार येथे पोहचले. याचवेळी जमलेल्या नागरिकांनी दोन चोरट्यांना पकडुन ठेवले होते. मात्र यातील एक चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला. दुसऱ्या चोरट्याने महिलांचा गाऊन घातला होता व तोंड पिशवी ने झाकले होते. दुकानाचे मालक अमोल डोंगरे यांना पोलिसांनी बोलावून घेतले व दुकानातील स्टॉक तपासायला सांगितला. या दरम्यान देखील दुसऱ्या चोरट्याने पळण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला. घटनास्थळी तोडलेले कुलूप होते व शटर उचकटण्यासाठी वापरलेली लोखंडी पारय देखील मिळाली. दुकानात शिरताना चोरट्यांनी काच देखील फोडली होती. एका गोणीत लाखो रुपये किमतीचे महागडे फोन भरून पळण्याचा या चोरट्यांचा डाव होता. मात्र नागरिकांच्या आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो फसला. दुसऱ्या चोरट्याने पळताना काही वस्तू नेल्या का ? हे तपासण्यासाठी आता दुकानातील स्टॉक तपासण्याचे काम सुरू आहे. एका चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:30 AM 13/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here