पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटे हातात दिवे घेऊन उभं राहण्याचं आवाहन केलं आहे. यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मोदींवर टीका केली. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार राम कदम यांनी नितीन राऊत यांना सवाल करत महाविकास आघाडीवरही टीका केली आहे. नितीन राऊत यांनी सेंट्रल पॉवर ग्रिडच्या अधिकाऱ्यांशी किंवा अन्य तज्ञांशी चर्चा न करता केवळ अभ्यासपूर्ण व्हाट्सअॅपच्या आधारावर बेजबाबदार वक्तव्य केलं आहे. देश रात्री झोपताना दिवे चालू ठेवून झोपतो? का बंद करून झोपतो?, राऊत केलेल्या या टीकेवरून तुमच्या सरकारचा भंपकपणा दुर्देवाने दिसून येतो, असं म्हणत कदम यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
