कर्णेश्वर-सोमेश्वर दर्शन सहलीचा बचत गटांचा उपक्रम

0

रत्नागिरी : श्रावण म्हणजे धार्मिक, उपवास-व्रतवैकल्यांचा महिना आणि श्रावणी सोमवार म्हणजे शंकराच्या देवळात जाण्याचा दिवस असतो. हेच औचित्य साधून राजवाडी (ता. संगमेश्वर) येथील बचत गटांनी एकत्र येऊन कर्णेश्वर-सोमेश्वर दर्शनाच्या आगळ्या सहलीचे आयोजन केले आहे.

कामाच्या व्यापामुळे किंवा अन्य काही कारणांनी इच्छा असूनही अनेकांना देवदर्शनाला जाता येत नाही. त्यांच्यासाठी खास या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन धूमधडाक्यात साजरा करत असतानाच श्रावणी सोमवारचा मुहूर्त साधून प्रसिद्ध कर्णेश्वर आणि सोमेश्वर मंदिरात दर्शनाचाही लाभ घडवून आणला जाणार आहे. संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील कर्णेश्वर मंदिर आणि राजवाडीचे श्री सोमेश्वर मंदिर या पुरातन देवस्थानांमधील दगड आणि लाकडावरील अप्रतिम कोरीव काम, राजवाडीतील नैसर्गिक गरम पाण्याच्या कुंडाचा अनोखा अनुभव या सहलीत घेता येईल.
रत्नागिरीहून संगमेश्वर आणि परत रत्नागिरी शहरात सोडण्याच्या प्रवासखर्चासह प्रत्येकी ५०० रुपये शुल्क सहलीसाठी आकारले जाईल. सकाळी ९.३० ते दुपारी ३ या वेळेत सहल पूर्ण होईल.

इच्छुकांनी शनिवार, १३ ऑगस्टपर्यंत आपला सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी सतीश कामत (7499874054) किंवा अजिंक्य प्रभुदेसाई (7620262717) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 13/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here