स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत चिरायू हॉस्पिटलमध्ये शानदार ध्वजारोहण

0

रत्नागिरी : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा मोहिमेला आज जिल्हाभरात आरंभ झाला. या अंतर्गत रत्नागिरीतील प्रसिद्ध चिरायू हॉस्पिटलमध्येही अमृत महोत्सव अंतर्गत तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी चिरायु हॉस्पिटलचे डॉक्टर्स, कर्मचारी आणि अधिकारी यांनी राष्ट्र ध्वजाला मानवंंदना दिली. राष्ट्रगीत सादरीकरण झाले.

चिरायु हॉस्पिटलचे डॉ.नितिन चव्हाण, डॉ.अनिरूध्द फडके, डॉ सचिन यादव, डॉ.ज्योती चव्हाण, डॉ.श्रीविजय फडके, डॉ.अभिजित पाटील, डॉ.पल्लवी यादव, सी. ओ.ओ. आनंद फडके सर व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

जिल्ह्याच्या विविध भागात तिरंगा मोहिमेला आज उत्साही वातावरणात आरंभ झाला. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील 100 फूटी स्तंभावरील ध्वजारोहणाने सुरुवात झाली. मुसळधार पाऊसधारांमध्ये भिजत हजारो रत्नागिरी करांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली व राष्ट्रभक्तीची ओळख करुन दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 PM 13/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here