खासदारांनी राजकीय टिका करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांकडे गांभिर्याने पहावे – अॅड. दीपक पटवर्धन

0

रत्नागिरी : खासदार विनायक राऊत हे लोकप्रतिनिधी आहेत. जनता जनार्दनाशी संवाद साधण्याची तसदी न घेता या कठीण प्रसंगात सर्वत्र लोकप्रियता मिळवण्यासाठी पंतप्रधानांच्या आव्हानाची खिल्ली उडवत आहेत. सकारात्मक ऊर्जा एकात्मता काय असते हे खासदारांच्या समजे पलिकडचे आहे. जो तो आपल्या बुद्धी नुसार विचार करतो. पंतप्रधानांनी केलेले आवाहन हे जनतेच्या मनातील सकारात्मक ऊर्जेचे प्रकटीकरण आहे. पंतप्रधानांवर टिका करणारे खासदार कोरोनाच्या संकटात मतदारसंघ असतांना कुठे दडी मारून बसलेत असा विचारण्याची वेळ आली आहे असे बीजेपी जिल्हाध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन यांनी म्हटले आहे. राऊतसाहेब खरेतर तुम्ही ना.उदय सामंतांकडून प्रेरणा घ्यायला हवी. सामंतसाहेब सतत प्रशासन, जनता यांच्या संपर्कात दिसतात. मात्र आपण पंतप्रधानांवर टिका करण्यामध्ये धन्यता मानता हे या मतदार संघाचे दुर्दैव असा टोला देखील अॅड. दीपक पटवर्धन यांनी लगावला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
01:51 PM 04/Apr/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here