अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा शब्द भाजपने दिलाच नव्हता : केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा

0


रत्नागिरी : भाजप-शिवसेना युती म्हणून २०१९ मध्ये राज्यात निवडणुका लढलो. मात्र त्यानंतर अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेने आम्हाला धोका देत पाठित खंजीर खुपसला. विरोधात लढलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी बरोबर महाविकास आघाडी केली. अडीच वर्षाचा शब्द आम्ही दिला नव्हता. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे स्वार्थासाठी बोलत आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले म्हणजे ते काही देव नाहीत. व्यथित होऊन ते असे बोलत आहेत, अशी खरमरीत प्रतिक्रिया भाजपचे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी दिला.

येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येवाळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, बाळ माने, अॅड. बाबा परुळेकर, सचिन वहाळकर, उमेश कुळकर्णी भाजपचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मिश्रा म्हणाले, ज्या जिल्ह्यात भाजपचा खासदार नाही, अशा जिल्ह्यांची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांना दिली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मात्र या लोकसभा मतदारसंघात अपेक्षात विकास झालेला दिसत नाही. भविष्यात या मतदारसंघामध्य भाजपचा खासदार असेल. भाजप कोणत्याही छोट्या पक्षाला संपविण्याचा प्रयत्न करीत नाही. शिवसेना-भाजप युती म्हणून आम्ही निवडणुका लढलो होतो. परंतु तेव्हा अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री असा कोणताही शब्द आम्ही दिला नव्हता. शिवसेनेनेच आमचा विश्वासघात केला आणि ते विरोधकांबरोबर जाऊन त्यांनी सरकार स्थापन केले. आता पुन्हा आमचे सरकर आले आहे. निवडणुकांसाठी आम्ही दौरे करत नाही, तर केंद्राच्या योजना सर्वसमान्य लोकांपर्यंत पोहचतात की नाही, याची माहिती घेण्यासाठी आलो आहे.

बिहारमध्ये जी काही राजकीय उलथापालत झाली. त्याचा कोणताही परिणाम अन्य राज्यात होणार नाही. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला संपविण्याचा प्रयत्न केलेला नाही. उलट सेनेतील गट आमच्याबरोबर आल्यानंतर आम्हाल सहज मुख्यमंत्रीपद मिळाले असते. परंतु आम्ही त्यांनी मुख्यमंत्रीपद दिले. आता शिंदे-फडणविस सरकार लवकरच पडेल, असा विरोधक आरोप करीत आहेत. परंतु हे आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांना बोलायला काही नाही म्हणून हे आरोप करीत आहेत. माझी त्यांना सहानुभुती आहे, असा चिमटाही श्री. मिश्रा यांनी काढला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:20 PM 13/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here