शिर्के प्रशालेत साकारली ७५ ची प्रतिकृती

0

मराठी पत्रकार संघाने केले राष्ट्रगीत गायन

HTML tutorial

रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभर सुरू असलेल्या ‘हर घर झेंडा’ अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाने शहरातील प्रसिद्ध शिर्के प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सामूहिक राष्ट्रगीत गायन केलं.

या कार्यक्रमासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे, निवृत्त कर्नल आणि शिर्के प्रशालेचे माजी विद्यार्थी शशिकांत सुर्वे, शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण, श्री. लिंगायत, श्री. कांबळे, श्री. देवळेकर, विनोद मयेकर यांच्यासह शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना निवृत्त कर्नल शशिकांत सुर्वे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना देश घडवण्यासाठी प्रत्येकाचे योगदान तितकेच मोलाचे आहे, आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना आजपासूनच आपल्या मनामध्ये जागृत करा आणि देशासाठी निश्चित काहीतरी करा अशा भावना व्यक्त केल्या. तसेच शिर्के प्रशालेमध्ये त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा अनुभव सुद्धा त्यांनी यावेळी विशद केला.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रशालेच्या पटांगणात ७५ हा आकडा रेखाटून त्यावर विद्यार्थी उभे राहिले. मृदुला मोरे या विद्यार्थिनीने भारत मातेची वेशभूषा केली होती. तिला महेश बने यांनी फेटा परिधान केला होता. तर दोन्ही बाजूला हातात राष्ट्रध्वज घेऊन विद्यार्थी उभे होते. त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले.

यावेळी रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय महाडिक, अध्यक्षा मैरून नाकाडे, सचिव राजेश कळंबटे, सल्लागार राजेंद्र चव्हाण, निलेश जगताप, राजेश चव्हाण, राकेश गुडेकर, मोरेश आंबुलकर, सचिन बोरकर, सचिन देसाई, विजय पाडावे, विशाल मोरे, तन्मय दाते, मकरंद पटवर्धन, कौस्तुभ वायंगणकर, अनघा निकम -मगदूम, संदीप चांदोरकर, मंगेश चव्हाण, तेजस दळवी, सुधीर पाटील आदी पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:22 PM 13/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here