महाराष्ट्रातील व खास करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बंधु भगिनींना जाहीर आवाहन व नम्र विनंती———————- कोरोनारुपी जगावर आलेल्या महाभयंकर व महाभयानक संकटावर मात करण्यासाठी जाती धर्माच्या भिंतीला तोडून ऐकत्र येत काम करू या—— हीच वेळ आहे ऐकजुटीने काम करण्याची, हीच वेळ आहे, शासन व प्रशासनाला सहकार्य करण्याची—- दिल्ली मरकज येथे जे काही घडले ते योग्य नाहीच, परंतु सर्व मुस्लिम बाधंवाना त्या निमित्ताने आज मी ऐक जाहीर आवाहन व नम्रपणे ऐक विंनती करीत आहे ती म्हणजे जर का महाराष्ट्र व खास करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर कोणी दिल्ली मरकज येथून आपल्या गावात अथवा मशिदीत आला असेल अथवा आले असतील तर त्यांनी तातडीने लगतच्या पोलीस स्टेशन, पोलीस पाटील, संरपच,नगराध्यक्ष, नगरसेवक तहसीलदार तलाठी अथवा गावप्रमुखांना कळवावे,, माहीती लपवू नका कोणी लपु नका——— कारण तुमच्या ऐका चुकीमुळे आणि बेजबाबदार पणा मुळे अखंड समाजाला त्रास व बदनामी सहन करावी लागत आहेच—परंतु अखंड गावाला व शहराला ना हक कोरोना सारख्या संकटाला सामोरे जावू लागत आहे,अथवा जावे लागेल,, पोलीस,डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व जिल्हा प्रशासन तुमचे शत्रू नसून रक्षणकर्त आहेत,तुमच्या साठी भगवान आहेत,,,कारण ते तुम्हाला संकटातून वाचवण्यासाठी आहेत,संकटात टाकण्यासाठी नाही—– शासनाच्या नियमाचे काटेकोर पणे पालन करा,,घरी रहा,सुरक्षित रहा,,कोणालाही त्रास देवू नका,ईस्लाम ने तर जगाला मानवतेचा संदेश दिला आहे,मग कुठे गेला तो मानवतावाद? काही मुठभर मुस्लिम बांधव समाजाला नाहक बदनाम करीत आहेत,,धिक्कार करतो व जाहीर निषेध करतो अश्या लोकांचा जे मुस्लिम समाजाला दावनीला बांधत आहेत————— सलाम त्या मुख्यमंत्र्यांना,,सलाम त्या आरोग्य मंत्र्यांना,,सलाम पोलीस प्रशासनाला,सलाम जिल्हा प्रशासनाला,,,सलाम सर्व डॉक्टर्स ना,आरोग्य कर्मचाऱ्यांना,,,,सर सलामत तो पगडी हजार—————– अलिमियां काझी,,वरिष्ठ पत्रकार, रत्नागिरी
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:17 PM 04-Apr-20
