राज्यावर कोरोनाचे संकट असतानाच उद्धव ठाकरेंसमोर थेट मुख्यमंत्रिपद जाण्याचाच धोका निर्माण झाला आहे. एप्रिल महिन्यात होणारी राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली आहे. हा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला. राज्य विधानपरिषदेच्या 9 जागा येत्या 24 एप्रिल रोजी रिक्त होत आहेत. पण ही निवडणूक कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासमोर या स्थितीमुळे नवा पेच निर्माण झाला आहे. कारण विधानपरिषद किंवा विधानसभा अशा कोणत्याही सभागृहाचे उद्धव ठाकरे हे सदस्य नाहीत. असे असताना मुख्यमंत्रिपदाची त्यांनी शपथ घेतली होती. मुख्यमंत्रिपदावर कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ राहता येत नाही. 28 मे रोजी उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला 6 महिने पूर्ण होत आहेत. त्यामुळे संवैधानिक पेच निर्माण झाला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:31 PM 04-Apr-20
