पांढरा समुद्र येथे तिघेजण बुडाले; दोघांना वाचवण्यात यश, एकजण बेपत्ता

0

रत्नागिरी : पांढरा समुद्र येथे पोहायला उतरलेले तीन तरुण समुद्रात बुडाल्याची घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. यातील दोघांना वाचवण्यात यश आले असून एक जण बेपत्ता झाला आहे.

सोमवारी 15 ऑगस्ट असल्याने सर्व आस्थापना बंद होत्या. फिनोलेक्स कॉलनी शेजारी कोस्ट गार्डच्या रहिवासी इमारतीचे काम सुरू आहे. या ठिकाणी मजूर म्हणून कामाला असलेले तीन तरुण समुद्र स्नानाचा आनंद लुटण्यासाठी पांढरा समुद्र येथे दाखल झाले. मद्य धुंद अवस्थेत हे तरुण समुद्रावर आले होते. समुद्राच्या पाण्यात सेल्फीसह व्हिडिओ शुटिंग सुरू होते. त्यांचा तोल जात असताना ते पाण्यात उड्या मारत होते.

त्यातील एक तरुण हा मोबाईलवर चित्रीकरण करीत होता तर दोघेजण मध्ये धुंद अवस्थेत समुद्रात लाटांवर उड्या मारत होते. बघता बघता त्यातील एक जण पाण्यात ओढला गेला आणि अचानक गायब झाला. तो बुडत असताना त्याचा एक हात वर दिसत होता. काही ग्रामस्थांनी दुरून तो बुडताना पाहिला मात्र ते समुद्रकिनारी पोहोचेपर्यंत फार उशीर झाला होता.

मुरुगडा परिसरातील ग्रामस्थांनी समुद्रावर धाव घेतली त्यातील दोघांना पाण्यातून बाहेर काढले. त्यातील अमन खान तरुण नशेमध्ये बेधुंद झाला होता. त्याच्या शेजारी असलेला त्याचा सहकारी अमीर खान हा कधी बेपत्ता झाला हे त्याला कळलेच नाही. ग्रामस्थांनी त्यातील दोघांना पाण्यातून बाहेर आणले आणि त्यांची विचारपूस सुरू केली. त्यावेळी आपण फिनोलेक्स कॉलनी शेजारी कोस्ट गार्डच्या रहिवासी मातीचे बांधकाम करत असल्याचे सांगून त्याच ठिकाणी राहिला असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतची माहिती तात्काळ शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांना देण्यात आले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

समुद्रात पोहण्यासाठी आलेले हे तिघेही करून मूळचे किशनगंज बिहारचे असून सध्या ते रत्नागिरीत वास्तव्याला आहेत या घटनेची माहिती त्यांच्या ठेकेदाराला देण्यात आली त्यानंतर त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान समुद्रात बेपत्ता झालेला आमिर खान याचा शोध सुरू असून त्याबाबतची नोंद शहर पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 16/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here