एम. आय. बी. हायस्कूलमध्ये सायबर क्राईमवर कार्यशाळा

0

खेड : शहरातील बज्म-ए-इमदादीया संचलित एम. आय. बी गर्ल्स हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये नुकतीच सायबर क्राईम कार्यशाळा झाली.

त्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलिस उप निरीक्षक सोनाली झेंडे व संकेत गुरव उपस्थित होते. शबिस्ता खानच्या कुरआन पठणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अफशा अॅण्ड ग्रुपने स्वागत गीताचे गायन केले. प्रशालेतर्फे मान्यवरांचे पष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी श्रीमती शेंडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सोशल मीडियाचा वापर करताना कोणती खबरदारी घ्यावी हे सांगितले. सूत्रसंचालन स्नेहल खेडेकर यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here