रत्नागिरी : शहरात जंतुसंसर्ग होऊ नये व नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे याकरिता रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत. संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी केल्यावर त्यांनी आता राजिवड्यातील गल्लीबोळातून जंतुनाशक फवारणी करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार कामाला सुरुवात झाली असून ज्याठिकाणी कोरोना बाधित रुग्ण रहात होत्या त्या घरावर जंतुनाशक फवारणी करण्यात आली असून आता राजिवड्यातील प्रत्येक गल्लीबोळात हि फवारणी सुरु आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:36 AM 05/Apr/2020
